मतदार कार्डाचे हे आहेत ५ महत्त्वाचे फायदे….!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

lok Sabha Elections Maharashtra 2024: मतदार कार्डाचे ५ महत्त्वाचे फायदे आणि मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी येथे अर्ज करा!

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यात धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई एकूण 13 जागांसाठी 20 मे रोजी निवडणूक होणार आहे.

नाशिकची शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम आणि गरुड रथोत्सव !

त्यानुसार या लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी ज्यांची दिनांक १ एप्रिल पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ज्यांचे नाव अजूनही मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही. ते या मतदार यादीत नवीन मतदार नोंदणीसाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. नाव नसल्यास लगेचच ते राज्य निवडणूक संघाच्या मतदार नोंदणी अर्ज क्रमांक ६ वर अर्ज करू शकतात.

मतदार कार्डाचे ५ फायदे

  1. मतदान कार्ड असल्याचा पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे निवडणुकांमध्ये तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळतो.
  2. मतदार कार्डामुळे निवडणुकीतील होणारी फसवणूक कमी होते म्हणजेच एखादी व्यक्ती त्याच्या नावाने फक्त एकदाच मतदान करू शकते.
  3. मतदान कार्ड हे सरकारद्वारे जारी केलेल्या ओळखीचा अधिकृत पुरावा म्हणून काम करते त्यामुळे तुम्ही हे कार्ड बँक खाते उघडणे, सरकारी सेवांसाठी अर्ज करणे किंवा ओळख पडताळणीच्या प्रक्रियेसाठी या मतदान कार्डाचा उपयोग होतो.
  4. भारतातील अनेक सरकारी अनुदानांचा किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक असते.
  5. मतदान कार्ड हा मतदान कार्ड हा ओळखीचा पुरावा आहे तो कोणत्याही व्यवहार किंवा परिस्थितीमध्ये वैध मानला जातो.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी तुम्ही येथे अर्ज करू शकता

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी नाशिक वनविभागाने केली ४६ हातपंप असलेल्या
पाणवठ्यांची निर्मिती!