बेस्ट रेस्टॉरंट शोधताय मग “या” टॉप १० रेस्टॉरंट्सला भेट द्यायला विसरू नका!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक मधील हे टॉप 10 रेस्टॉरंट्स तुम्ही जर फूड लवर असाल आणि चांगल्या चवीच्या शोधात असाल तर या रेस्टॉरंट्सला भेट द्यायला विसरू नका!

Best Restaurants Nashik : नाशिक हे तीर्थक्षेत्र, वाईन कॅपिटल, द्राक्ष, जुनी प्राचीन मंदिरे, आणि गोदावरी यासाठी प्रसिद्ध आहे. हे सर्वांना माहित आहे पण तुम्हाला माहित आहे का? नाशिक इथल्या खाद्यपदार्थांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. खास करून इथले रेस्टॉरंट्स त्यापैकीच काही हे टॉप 10 रेस्टॉरंट तुम्ही जर फूड लवर असाल आणि चांगल्या चवीच्या शोधात असाल तर हे रेस्टॉरंटचे पर्याय खास तुमच्यासाठी. अश्याच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या गोष्टी, पर्यटन आणि ताज्या घडामोडींची माहिती व्हाट्सअपवर मिळवण्यासाठी माझं नाशिक या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा!

Top 10 Best Restaurants In Nashik

1. Sadhana Restaurant ( साधना रेस्टॉरंट )

साधना रेस्टॉरंट हे साधना मिसळ म्हणून देखील ओळखले जाते. साधना मिसळ हे नाशिकच्या लोकप्रिय रेस्टॉरंट पैकी एक रेस्टॉरंट आहे. साधना रेस्टॉरंटची खासियत इथली चुलीवरची मिसळ आहे. मिसळ पाव सोबतच यांची गुळाची जिलेबी आणि चॉकलेट पान सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यासोबतच मुलांना खेळण्यासाठी जागा आहे.

Sadhana Restaurant

Sadhana Restaurant Address | पत्ता

हरदेव बाग, गंगापूर-सातपूर लिंक रोड, वर्धन फाटा, सोमेश्वर जवळ, नाशिक.

पर्यटकांना भुरळ पाडणारे “सुला रिसॉर्ट”

2. Veg Aroma ( व्हेज अरोमा )

व्हेज अरोमा हे नाशिकच्या सर्वोत्तम शाकाहारी शाकाहारी रेस्टॉरंट पैकी एक आहे. या रेस्टॉरंट मध्ये उत्तर भारतीय पद्धतीचे जेवण मिळते तसेच ते नाशिकची प्रसिद्ध असलेली मिसळ सुद्धा देतात. त्यासोबत येथे चायनीज आणि इटालियन पद्धतीचे जेवण सुद्धा येथे मिळते. यांची खासियत मिसळ पाव आणि रुमाली खाकरा आहे.

Veg Aroma

Veg Aroma Address | पत्ता

गंगापूर रोड, काळे नगर, विवेकानंद नगर, आनंदवली, नाशिक.

3. Little Italy ( लिटल इटली )

ज्यांना आपल्या कुटुंबासोबत किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत candlelight dinner ( कॅण्डल लाईट डिनर ) करायचे असेल त्यांच्यासाठी Little Italy रेस्टॉरंट एक उत्तम पर्याय आहे. हे रेस्टॉरंट आरामदायी आणि निवांत वातावरणासाठी स्थानिक तसेच पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. या रेस्टॉरंटमध्ये व्हेजिटेरियन इटालियन पद्धतीचे जेवण मिळते. यांची खासियत पेस्टो पास्ता, चीजी पास्ता, ब्रुशेटास आहे.

Little Italy

Little Italy Address | पत्ता

36/2, गोवर्धन गाव, गंगापूर-सावरगाव रोडच्या बाजूला, सातपूर, नाशिक.

4. Curry Leaves ( करी लिवज )

करी लिवज हे रेस्टॉरंट नाशिकच्या चांगल्या व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स पैकी एक आहे. हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज असून हे उत्तर भारतीय, चायनीज, फास्ट फूड या पद्धतीचे जेवण देतात. यांची खासियत रूमाली खाकरा आणि मंचाव सूप आहे.

Curry Leaves

Curry Leaves Address | पत्ता

जेहान सर्कल, गंगापूर रोड, कॉलेज रोड, नाशिक.

Did You Know the History of Restaurant Bhagat Tarachand, Nashik?

5.The Sidewalk (द साईडवॉक )

द साईडवॉक हे नाशिकच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट पैकी एक असून हे रेस्टॉरंट येथील आरामदायी वातावरण आणि निवांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हे नॉनव्हेज जेवणासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायचा असेल तर हे रेस्टॉरंट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यांची खासियत पिझ्झा बर्गर आणि ब्राउनीज आहे

The Sidewalk Address | पत्ता

प्लॉट 20, BLVD, त्र्यंबकरोड, एमआयडीसी, सातपूर, नाशिक.

6. Barbeque Nation ( बाबेक्यु नेशन )

बाबेक्यु नेशन ही भारतातील सर्वात मोठी फुड चैन असल्याने बाबेक्यु नेशन हे नाशिक मधल्या टॉपच्या रेस्टॉरंट्स एक आहे. ज्यांना बाबेक्यु फूड आवडत असेल त्यांच्यासाठी हे रेस्टॉरंट म्हणजे स्वर्ग आहे. हे रेस्टॉरंट नॉनव्हेजिटेरियन जेवणासाठी प्रसिद्ध आहे. यांची खासियत मटन बिर्याणी, गुल्फी, मॉकटेल आणि चीज केक आहे.

Barbeque Nation Address | पत्ता

दुसरा मजला, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, लवाटे नगर, बनियन स्क्वेअर, उंटवाडी, पारिजात नगर, नाशिक.

7. RiverDine Restaurant ( रिव्हर डाईन )

रिव्हर डाईन रेस्टॉरंट हे शांत, निवांत वातावरणात डिनरचा आनंद घेण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे. रेस्टॉरंटच्या जेवणाची चव आणि त्यांचे सादरीकरण खूप छान आहे. जेवणासोबतच येथे लाईव्ह म्युझिक आणि मोठ्या स्क्रीन आहे या स्क्रीनवर तुम्ही तुमच्या आवडते सामने किंवा तुमचा आवडता शो बघू शकता. हे रेस्टॉरंट बटर चिकन साठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हे रेस्टॉरंट नाशिकच्या टॉप रेस्टॉरंट्स पैकी एक आहे. यांची खासियत बटर चिकन, प्रॉन टेंपुरा आणि कॉर्न आणि चीज क्रोकेट्स आहे.

 RiverDine Restaurant

RiverDine Restaurant Address | पत्ता

आसाराम बापू आश्रम पुलासमोर, नंदनवन लॉन्सजवळ, सावरकर नगर एक्स्टेंशन, गंगापूर रोडच्या बाजूला, कॉलेज रोड, नाशिक.

8. Al Arabian Express( अल अरेबियन एक्सप्रेस )

अल अरेबियन एक्सप्रेस हे Shawarma ( शवरमा ) साठी प्रसिद्ध आहे. हे रेस्टॉरंट नाशिकच्या लोकप्रिय नॉनव्हेज रेस्टॉरंट पैकी एक आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालू शकता. यांची खासियत Shawarma ( शवरमा ), चिकन टिक्का आणि चिकन बिर्याणी आहे.

Al Arabian Express

Al Arabian Express Address | पत्ता

बिग बाजार जवळ, कॉलेज रोड, नाशिक

9. Asian Platter ( एशियन प्लॅटर्स )

एशियन प्लॅटर्स हे रेस्टॉरंट् उत्तम जेवणासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे रेस्टॉरंट उत्तर भारतीय, चायनीज आणि मुगलई सारख्या पद्धतीचे जेवण देते. तसेच इथे बुफे जेवणाची सुद्धा सोय केली आहे. हे रेस्टॉरंट नाशिकच्या टॉप रेस्टॉरंट पैकी एक आहे. यांची खासियत मोमोज, स्वीट कॉर्न सूप आहे.

Asian Platter

Asian Platter Address | पत्ता

वासन हाऊस, न्यू मुंबई आग्रा हायवे, वासन बजाज शोरूमजवळ, मुंबई नाका, कॉलेज रोड, नाशिक.

नाशिकचं सौंदर्य “सुला व्हिनयार्ड्स” चा अनुभव तुम्ही घेतला का?

10. Grill Punjab ( ग्रील पंजाब )

ग्रील पंजाब हे उत्तर भारतीय चवीच्या जेवणासाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे रेस्टॉरंट उत्तर भारतीय जेवणाबरोबरच प्लीज आणि कॉन्टिनेन्टल जेवण सुद्धा देतात. छान शांत वातावरण आणि कुटुंबासोबत दिनाचा आनंद घेण्यासाठी हे रेस्टॉरंट एक उत्तम पर्याय आहे.यांची खासियत बटर चिकन, चिकन रारा आहे.

Grill Punjab

Grill Punjab Address | पत्ता

रामदास कॉलनी, बॉईज टाऊन स्कूलच्या मागे, कॉलेज रोड, नाशिक

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!