एकलहरे येथील पाॅवर ट्रान्सफॉर्मर मध्ये झाला बिघाड सुमारे ६० गावांचा वीज पुरवठा बंद!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात येथे असलेल्या १५० व्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये अचानक बिघाड झाला आहे. यामुळे सुमारे ६० गावांचा वीज पुरवठा बंद झाला आहे.

Eklahare Power Plant | सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात येथे असलेल्या १५० व्ही क्षमतेच्या पाॅवर ट्रान्सफॉर्मर मध्ये अचानक बिघाड झाला आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने सुमारे ५० ते ६० गावांचा तसेच नाशिक रोड मधील काही भागाचा वीज पुरवठा बंद पडला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मर चे काम सुरू असून या गावांना पर्यायी स्त्रोतांद्वारे टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा केला जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी होतेय सज्ज!

एकलहरे येथील वीज केंद्रातून पचक, मुक्तिधाम, भगुर, देवळालीगाव, सामनगाव आणि एकलहरे येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रांना वीज पुरवठा केला जातो. पण पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये झालेल्या बिघाडामुळे यात अडचण निर्माण झाली असून किमान ४८ ते ७२ तास यापॉवर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी लागू शकता. त्यामुळे या भागात वीज पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. असे महावितरणने सांगितले आहे. नागरिकांनी पॉवर ट्रान्सफॉर्मरचा बिघाड लक्षात घेता महावितरणला सहकार्य करावे.

आजची मोठी बातमी भारतीय वायु दलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात, नाशिकमध्ये कोसळले विमान

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment