मित्रांनो पावसाळ्यात पिकनिकचे प्लॅन करत आहात तर या ३ ठिकाणी जायला विसरू नका!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

मित्रांनो पावसाळ्यात पिकनिकचे प्लॅन करत आहात तर या ३ ठिकाणी जायला विसरू नका!!

Nashik Places To Visit In Monsoon

Dugarwadi Falls | दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा हा त्रंबकेश्वर-जव्हार रस्त्यावर असलेल्या दुगारवाडी गावाजवळ आहे. हा धबधबा अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेतील पर्वतावरून 450 फूट उंचीवरून हा धबधबा खाली कोसळतो. पावसाळ्यात सतत वेगाने खाली वाहणाऱ्या पाण्याचा रंग दुधासारखा पांढराशुभ्र दिसतो. त्यामुळेच कदाचित या धबधब्याला दुधारवाडी धबधबा असे नाव पडले असावे. तसे या धबधब्याला तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील भेट देऊ शकता मात्र तुम्ही जर फोटो, पक्षी आणि निसर्गप्रेमी असाल तर जून ते सप्टेंबर या दरम्यान तुम्ही दुधारवाडी धबधब्याला भेट देऊ शकता.

नाशिक शहरापासून या धबधब्याचे अंतर 37 किलोमीटर असून या धबधब्यापासून त्र्यंबकेश्वर हे जवळचे ठिकाण आहे. ह्या धबधब्याला भेट देण्या वेळेस ट्रेकिंग शूज पाहिजेत तसेच सोबत येताना खाण्याचे आणि पाणी देखील आणणे आवश्यक आहे.

धबधबा नाव (Waterfall Name)दुगारवाडी (Dugarwadi)
ऊंची (Height)420
ठिकान (Place)नाशिक (Nashik)
जवलचे गांव (Nearest Village)दुगारवाडी
धबधबा नाव (Waterfall Name)दुगारवाडी (Dugarwadi)
ऊंची (Height)420
ठिकान (Place)नाशिक (Nashik)
जवलचे गांव (Nearest Village)दुगारवाडी
Dugarwadi Falls

How to Reach Dugarwadi Waterfall from Nashik?

नाशिकहून दुगरवाडी धबधब्याला कसे जायचे?

मुंबईवरून नाशिकला येण्यासाठी रेल्वेबस टॅक्सी तसेच खाजगी वाहने उपलब्ध आहे, नासिक वर्तुन त्रंबकेश्वर ला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहने आहेत, पण दुगारवाडी परिसरात जाण्यासाठी स्वतःची वाहन असेल तर उत्तम आहे. तसेच पुण्यावरून येण्यासाठी बस किंवा पुणे मनमाड एक्सप्रेस रेल्वे आहे, तसेच पुढे खाजगी वाहनाने जाता येते.

एक दिवसासाठी पिकनिकला जात आहात तर, नाशिक जवळच्या या ठिकाणांना तुम्ही नक्की भेट द्या!

नाशिकमधील कपल्ससाठी परफेक्ट स्पॉट!

Brahmagiri Hills

ब्रह्मगिरी

ब्रह्मगिरी पर्वत हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम घाटातील एक पर्वत आहे. ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 1298 मीटर आहे. याच पर्वतातून पवित्र गोदावरी नदीचा उगम आहे. ब्रह्मगिरी पर्वताची उंची आणि सभोवताली असलेले घनदाट जंगल आणि या जंगलात आढळणाऱ्या वन्य प्राण्यांच्या विविध प्रजाती यामुळे ब्रह्मगिरी पर्वत हे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी हे एक प्रमुख आकर्षण आहे.

ब्रह्मगिरी पर्वताला हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. या पर्वताच्या पायथ्याशी बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे असणारे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग वसलेले आहे. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला एक विशेष महत्त्व आहे. एका पौराणिक कथेनुसार गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या हे दोघे त्रंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावर त्यांचे वास्तव्य होते. गौतम ऋषींच्या हातून अनावधानाने गोहत्या झाली. या गोहत्याचे पाप धुण्यासाठी स्वर्गातून गंगा नदीला पृथ्वीवर ब्रह्मगिरी पर्वतावर आणायचे होते त्यासाठी गौतम ऋषिंनी भगवान शंकराची आराधना केली. गौतम ऋषींच्या आराधनाने भगवान शंकर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि त्या ठिकाणाहून गोदावरी उगम झाला आहे. आजही त्या ठिकाणी जटा मंदिर आहे. या ठिकाणी आजही आपण भगवान शंकरांच्या जटांच्या खुणा आहेत. या ब्रह्मगिरी पर्वताला सद्यो-जटा, वामदेव, अघोरा, इशाना आणि तत्-पुरुष अशी पाच शिखरे आहेत. या पाच शिखरांना भगवान शंकराची पाच मुखे मानली जातात.

ब्रह्मगिरी पर्वत सर करण्याकरिता कमीत कमी चार ते पाच तास लागतात. रस्त्यात मोठ्या प्रमाणात माकडे आहेत, तसेच पर्यटकांसाठी पर्वतावरती पिण्याचे पाण्याची सोय केली आहे

Brahmagiri Hills
किल्लाचे नाव (Fort Name)ब्रह्मगिरी (Brahmagiri)
ऊंची (Height)१२९५ फूट (1295 Ft)
ठिकान (Place)नाशिक (Nashik)
जवलचे गांव (Nearest Village)त्र्यंबकेश्वर (trabakeshwar)
सदयाची स्थिति (Current status)व्यवस्थित (properly)
चढ़ाई चो श्रेणी (Climbing Cho range)सोपी (simple)

बेस्ट रेस्टॉरंट शोधताय मग “या” टॉप १० रेस्टॉरंट्सला भेट द्यायला विसरू नका!

Anjaneri Fort

अंजनेरी किल्ला

Anjaneri Fort
किल्लाचे नाव (Fort Name)अंजनेरी (Anjaneri)
ऊंची (Height)४२०० फूट (4200 Ft)
ठिकान (Place)नाशिक (Nashik)
जवलचे गांव (Nearest Village)अंजनेरी (Anjaneri)
सदयाची स्थिति (Current status)व्यवस्थित (properly)
चढ़ाई चो श्रेणी (Climbing Cho range)सोपी (simple)

अंजनेरी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पवनपुत्र हनुमान यांचा अंजनेरी किल्ल्यावर जन्म झाला आहे, पवनपुत्र हनुमान हे अंजनी मातेच्या पोटी जन्माला आले आणि त्यांचा जन्म या किल्ल्यावर झाला म्हणून या किल्ल्याला अंजनेरी नावाने ओळखले जाते. असं सांगते की पवनपुत्र हनुमान हे लहान चे मोठे अंजनेरी किल्ल्यावर झाले, तसेच या किल्ल्यावरती १०८ जैन लेणी आहे.

Places to see in Anjaneri Fort

अंजनेरी किल्ल्यावर बघण्याची ठिकाणे:

  • जैन लेणी अंजनेरी गावातून किल्ल्याकडे जाताना पायऱ्यावरती गेल्यावर थोड्याच अंतरावर जैन लेणी दिसून येते.
  • पवनपुत्र हनुमानांचा तलाव अंजनी देवीच्या समोरच एक तलाव आहे, त्या तलावास हनुमान तलाव म्हणून ओळखले जाते, या तलावाची अशी एक आख्यायिका सांगते की, जेव्हा पवनपुत्र हनुमान जी लहान असताना सूर्याला फळ समजून खायला निघाले. तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच उडी घेतल्याने हा तलाव निर्माण झाला. असे सांगण्यात येते की बारकाइने बघितल्यावर लगेच तुमच्या लक्षात येईल की डाव्या पायाची निशाण आणि त्याचे बोट सूर्याच्या दिशेने आहे.
  • अंजनी मातेचे मंदिर किल्ल्यावरती चढत असताना जेव्हा पायऱ्या संपतात समोरच एक पठार दिसून येतो त्या पठारावरती अंजनी मातेचे मंदिर आहे.
  • अंजनी मातेची गुफा तिथे समोर गेल्यावर अंजनी मातेची गुफादिसून येते, असे सांगण्यात येते की अंजनी मातेने भगवान शंकरांकडे पुत्र व्हावे म्हणून आठ वर्षे तपश्चर्या केली त्यानंतर पवनपुत्र हनुमान यांचा जन्म झाला.
  • पवनपुत्र हनुमान आणि अंजनी माता यांचे मंदिर अंजनी मातेच्या कुशीत असलेले हनुमान जी यांची एकमेव मूर्ती इथे आहे अंजनी मातेने हनुमानजी यांना येथे जन्म दिला असेही सांगत येते.

10 Benefits of Visiting the Trimbakeshwar Jyotirlinga Temple in Nashik!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!