सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी होतेय सज्ज!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी सुरू झाली आहे.

Kumbh Mela Nashik Next Date | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासोबत इतर मनपा अधिकाऱ्यांनी पंचवटी, रामकुंड परिसरात कोणती कामे करायची आहेत? आणि कोणती कामे करणे अतिआवश्यक आहे? या दृष्टीने पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात अनेक महानगरपालिकेचे अधिकारी सहभागी होते.

आजची मोठी बातमी भारतीय वायु दलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात, नाशिकमध्ये कोसळले विमान

यावेळी या अधिकाऱ्यांनी साधूग्राम येथील उभारण्यात आलेल्या कमानीचे नूतनीकरण, सुशोभीकरण करणे तसेच हनुमान मंदिर परिसरात अनधिकृतपणे बांधलेला श्री शनेश्वर मंदिर गाईचा गोठा त्याबरोबरच बटुकेश्वर मंदिराजवळ झालेले अनधिकृत बांधकाम व नाशिक मनपाच्या जागेत झालेले अतिक्रमण हटवण्याच्या सूचना आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना दिल्या. याबरोबरच तपोवन परिसरातील कपिला-गोदावरी संगम इथे पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी लक्ष्मण झुला पुलाच्या जागेची देखील पाहणी केली.

त्यासोबतच भुयारी गटार योजनेची कामे, पाणीपुरवठा साधू ग्रामाला होणारा, पाणीपुरवठा विद्युत विषयककामे, मनपाच्या तपोवन इथल्या बस डेपोची जागा व अनेक रस्त्यांची पाहणी यावेळी केली गेली. तपोवन येथील मनपाच्या मलशुद्धीकरण केंद्राची देखील पाहणी केली गेली. एकंदरीतच महानगरपालिकेच्या कामाचा वेग बघता सिंहस्थ कुंभमेळ्याची लगबग चालू झाली असून लवकरच सिंहस्थ कुंभमेळासाठी नाशिक नगरी सज्ज होणार आहे.

नाशिकच्या गोदा घाट परिसरात डासांची वाढ!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!