यादव काळापासून हरिहरेश्वर किल्ल्याला इतके महत्त्व का होते? का मराठ्यांना हा किल्ला इतका महत्त्वाचा होता ?


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळा असणारा, सर्वात कठीण चढाई ८०° रेषेत चढाई असलेला हरिहरेश्वर किल्ला. या किल्ल्याला हरिहर किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. यादव काळापासून या किल्ल्याला इतके महत्त्व का होते? का हा किल्ला मराठ्यांना इतका महत्त्वाचा होता? हे जाणून घ्या!

Harihareshwar Fort Nashik | नाशिक जिल्ह्यात खूप सारे सुंदर किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याला त्याचा समृद्ध इतिहास आहे. त्यापैकीच हरिहरेश्वर किल्ला एक अतिशय महत्त्वाचा आणि समृद्ध किल्ला. सह्याद्रीच्या कुशीत त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत डौलाने उभा असलेला आणि इतिहासाची साक्ष देणारा हरिहरेश्वर किल्ला. हरिहरेश्वर किल्ला, हरिहर किल्ला किंवा हर्ष किल्ला या नावाने हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्याने यादव काळापासून ते इंग्रजांपर्यंत अनेक आक्रमणे झेलली. हा किल्ला ज्या साम्राज्यात समाविष्ट झाला त्या-त्या वेळेस त्याचे नाव बदलले गेले. या किल्ल्याचे नाव जरी काळानुसार बदलत गेले तरी या किल्ल्याचे महत्व कोणीच बदलू शकले नाही. हा किल्ला स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. या किल्ल्याची भुरळ यादव काळापासून ते आज पर्यंत टिकून आहे फरक फक्त इतकाच की त्या काळात हा किल्ला राजांना भुरळ पाडत होता आणि आता आपल्यासारख्या ट्रेकर्सना आणि पर्यटकांना भुरळ पाडतोय. असा हा उत्तम स्थापत्य शैलीचा नमुना ८०° अंशाचा तीव्र उतार असलेला किल्ला, मराठ्यांचा सर्वात महत्त्वाचा किल्ला हरिहर किल्ला!

Harihar Fort Nashik History

हरिहर किल्ला नाशिक चा इतिहास

हरिहर किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम घाटात त्रंबकेश्वर पर्वतरांगेत आहे. या किल्लाचे बांधकाम साधारणतः ९व्या ते १४व्या शतकाच्या दरम्यान यादवकाळात केले गेले असल्याचा अंदाज आहे. हा किल्ला गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आला होता. यादव काळापासून ते हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात येईपर्यंत ह्या हरिहर किल्ल्यावर विविध आक्रमकांनी हल्ला केला आणि हा किल्ला ज्या-ज्या आक्रमकांकडे गेला त्यांनी दरवेळेस या किल्ल्याचे नाव देखील बदलले. यादवकाळानंतर बराच काळ हा किल्ला अहमदनगर सलतनीच्या ताब्यात होता. त्यानंतर इ.स. १६३६ मध्ये हरिहर किल्ल्याबरोबरच त्रिंगलवाडी, त्रंबक आणि इतर काही पुण्यातील किल्ले शहाजीराजे भोसले यांनी मुघल सेनापती खान जमान याच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर मराठ्यांनी पुन्हा या किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. बराच काळ हा किल्ला स्वराज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. इ.स.१८१८ मध्ये त्र्यंबकच्या पथनावर ब्रिटिशांना शरण आलेल्या १७ मजबूत किल्ल्यांपैकी हरिहर किल्ला हा एक होता जेव्हा सर्व किल्ले कॅप्टन ब्रिग्ज ने ताब्यात घेतले होते.

एक दिवसासाठी पिकनिकला जात आहात तर, नाशिक जवळच्या या ठिकाणांना तुम्ही नक्की भेट द्या!

Why was Harihar Fort so important to the Marathas?

का मराठ्यांना हरिहर किल्ला इतका महत्त्वाचा होता?

बघायला गेलं तर यादव काळापासूनच हरिहर एक महत्त्वाचा आणि मजबूत किल्ला होता. पण स्वराज्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता. कारण हा किल्ला गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी सुरक्षेच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. तसेच या किल्ल्यामुळे आत्ताचे महाराष्ट्र आणि गुजरात चा भाग जोडला जात होता. तसेच हरिहर किल्ला हा एक उत्तम स्थापत्यशैलीचा नमुना आहे. हरिहर किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३६७६ फूट इतकी आहे. हा किल्ला पायथ्यापासून चौरस आकार दिसतो पण त्याची रचना त्रिकोणाकार प्रिझम सारखी आहे. या किल्ल्याची रचना दोन्ही बाजूंनी 0° असून किल्ल्याची तिसरी बाजू ८०°अंश आहे. त्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी आहे. या किल्ल्याला ८०° रेषेत कातळ कोरीव पायऱ्या आहेत या पायऱ्या चढण्यासाठी फक्त कातळ कोरीव कोणारे ( खाचे )आहेत. त्यामुळे शत्रूचा धोका कमी होता.

मित्रांनो पावसाळ्यात पिकनिकचे प्लॅन करत आहात तर या ३ ठिकाणी जायला विसरू नका!

Harihar Fort Nashik Trek

हरिहर किल्ला नाशिक ट्रेक

हरिहर किल्ला हा ट्रेकिंग साठी खूप प्रसिद्ध आहे. हरिहर किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हरिहर किल्ल्याची चढाई. ही चढाई सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात कठीण चढाई आहे. एक किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे या किल्ल्याच्या पायऱ्या या किल्ल्याला सुमारे 200 पायऱ्या असून ह्या पायऱ्या ८०° झुकलेल्या आहेत. या पायऱ्या कातळ कोरीव असून या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंनी कोणारे ( खाचे ) आहेत. या कोणाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला वर चढता येते. त्यामुळे या पायऱ्या चढताना किंवा उतरताना हृदयाचा ठोका चुकवतात. या पायऱ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट आहे.

अशाच नाशिक जिल्ह्यातील पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment