नाशिकचे 2200 हज यात्रेकरू “मक्का”मध्ये दाखल शुक्रवारपासून होणार यात्रेला सुरुवात


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

शुक्रवारी म्हणजेच 14 जूनला होणाऱ्या मक्का येथील यात्रेसाठी नाशिकचे 2200 हज यात्रेकरू मके मध्ये दाखल झाले आहेत.

Mecca Madina Hajj | इस्लामी कालगणनेचा शेवटचा महिना जिलहिज्जा हा हज यात्रेसाठी ओळखला जाणारा महिना आहे. इस्लाम धर्माच्या पाच मूलस्तंभापैकी महत्त्वाची आणि पवित्र असलेल्या हज यात्रेसाठी सौदी अरेबिया देशातील मक्का या शहरात नाशिक जिल्ह्यातून 2200 हज यात्रा यात्रेकरू पोहोचले आहेत. या यात्रेकरूमध्ये 20 ते 30 वयोगटातील सहा युवती आणि दोन युवकांचाही समावेश आहे. यावर्षी एका यात्रेकरूला हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून 3,36,330 रुपये इतका खर्च आलेला आहे.

एकलहरे येथील पाॅवर ट्रान्सफॉर्मर मध्ये झाला बिघाड सुमारे ६० गावांचा वीज पुरवठा बंद!

इस्लाम मध्ये शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे अनिवार्य असते. दरवर्षी सौदी अरेबिया देशातील मक्का मदीना या दोन शहरांमध्ये ही यात्रा पार पडते. दरवर्षी या यात्रेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिमबांधव या ठिकाणी दाखल होतात. यावर्षी भारतासाठी 1,75,000 हज यात्रेकरूचा कोटा सौदी सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी महाराष्ट्र राज्यासाठी 19,624 यात्रेकरूचा कोटा मिळाला होता. नाशिक शहरातून 400 तर मालेगाव मधून 1,800 यात्रे करू सौदीमध्ये या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. राज्यातून 26 मे पासून सौदीसाठी विमानांचे उड्डाण मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सुरू होते. या विमानांचे शेवटचे उड्डाण ९ जून रोजी झाले. शुक्रवारपासून हज यात्रेला मक्का शहरांमध्ये सुरुवात होणार आहे. रविवारी येथे सर्व यात्रेकरू बकरी ईदचे सामूहिक नमाजपठण करतील. नाशिक शहरासह जिल्हात सोमवारी ( दि. १७ ) बकरी ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी होतेय सज्ज!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment