महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहिण” योजना अर्ज करण्यासाठी फक्त १५ दिवसांची मुदत लगेच अर्ज करा!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती जाणून घ्या!

Ladki Bahin Yojana Detail Information | महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी अर्थसंकल्प सभागृहात मांडला होता. हा अर्थसंकल्प आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, बेरोजगारांसाठी योजना, मुलींचे मोफत शिक्षण या योजनांच्या घोषणा केल्या. हा अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी” या योजनेची देखील घोषणा केली. या योजनांची अंमलबजावणी १ जुलै पासून केली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यामुळे पात्र असलेल्या महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज कसा करावा याबाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे.अशाच महत्वाच्या योजना, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Ladki Bahin Yojana Detail Information

Eligibility for Ladaki Bahin Yojana

लाडकी बहिण योजनेसाठीची पात्रता

 1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
 2. विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या (नवर्यापासून वेगळी राहणारी आणि निराधार महिलांना ही योजना लागू होईल
 3. या योजनेची वयोमर्यादा 21 ते 60 वर्षापर्यंत आहे.
 4. या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
 5. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न बीड २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.

या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलाच पाहिजे!

Documents required for Ladaki Bahine Yojana

लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

 1. लाभार्थ्याचे आधार कार्ड
 2. आधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
 3. उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे )
 4. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
 5. पासपोर्ट फोटो
 6. रेशन कार्ड

लाडकी बहिण योजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा

How to apply for Ladki Bahin Yojana?

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कसा करावा?

लाडकी बहिण योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात (नागरी/ग्रामीण/आदिवासी/ग्रामपंचायत/सेतू सुविधा केंद्रात) उपलब्ध असतील. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Leave a Comment