उन्हाळ्यात या 5 टिप्स फॉलो कराल तर निरोगी रहाल!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

उन्हाचा तडाका वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या तसेच त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.त्यामुळे तुम्हाला जर उन्हाळ्यात निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला या 5 टिप्स फॉलो करायलाच हव्या!

Health Tips Of Summer

सध्या उन्हाचा तडाका वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या तसेच त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. उन्हामुळे डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे, उष्माघात, अन्नातून विषबाधा, पोटाचा त्रास, जुलाब या समस्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. तुम्ही अगदी थोडा वेळ उन्हात गेला तर लगेच तुम्हाला डोकेदुखी जाणवते. त्यामुळे तुम्हाला जर उन्हाळ्यात निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला या टिप्स फॉलो करायलाच हव्या!

मतदार कार्डाचे हे आहेत ५ महत्त्वाचे फायदे….!

5 Health Tips Of Summer

  1. दिवसभर भरपूर पाणी प्या. पण उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजमधलं थंड पाणी पिऊ नका. त्या ऐवजी माठातील पाणी प्या. किंवा फ्रिज मधल्या पाण्यात साधे पाणी मिक्स करून पिले तरीही चालेल. प्रत्येक 30 मिनिटांनी पाणी प्या. तसेच तुम्ही नारळ पाणी किंवा फळांचा रस घेऊ शकता. मद्यपान, चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स ( शीतपेय ) पिणं टाळा. नाहीतर डिहायड्रेशन ची शक्यता वाढते.
  2. तुम्हाला जर ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणं यासारखी लक्षणं जर असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही लक्षणं उष्माघाताची असू शकतात.
  3. उन्हाळ्यात शक्यतो सुट सुटसुटीत असे सुती कपडे घाला. कपडे शक्यतो हलक्या रंगाचे सैल आणि सच्छिद्र असावे जेणेकरून शरीराला जास्त घाम येणार नाही.
  4. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. त्यामुळे पोटाचा ,पचनाचा त्रास होतो. शक्यतो घरी बनवलेल अन्न खा. टोमॅटो, काकडी, बटाटा, भोपळा यासारख्या भाज्या अधिक प्रमाणात खा. कलिंगडाचा आणि लिंबाचा आहारात समावेश करा.
  5. दुपारच्या वेळेस घराबाहेर जाण टाळा शक्यतो दुपारी 12 ते 3 च्या सुमारास घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडताना स्कार्फ, टोपी, सनग्लासेसचा वापर करा.

वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी नाशिक वनविभागाने केली ४६ हातपंप असलेल्या पाणवठ्यांची निर्मिती!

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!