निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

ST Mahamandal News | निवृत्त झालेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा पती वयाच्या 75 वर्षापर्यंत प्रवासासाठी मोफत पासची सुविधा मिळणार आहे असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या!

एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी मोफत एसटीच्या साध्या बसमधून मोफत प्रवासासाठी पास मिळतात. पण आता त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना स्लीपर कोच बस मध्येही प्रवास करता येईल पण त्यासाठी त्यांना भाड्याच्या फरकाचे पैसे भरावे लागतील. या व्यतिरिक्त निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नीला वयाच्या 75 वर्षापर्यंत मोफत पासची सुविधा मिळणार आहे असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाच्या 75 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी जुलै ते फेब्रुवारी दरम्यान एकदा मोफत प्रवासासाठी पास मिळतो. या आधी निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी दगावल्यास त्यांच्या पत्नी किंवा पतीला वयाच्या 65 वर्षापर्यंत मोफत पास मिळायचा पण आता जिवंत कर्मचाऱ्यांसारखाच दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी किंवा पतीला वयाच्या 75 वर्षापर्यंत मोफत पास मिळणार आहे.

पूर्वीच्या पासवर फक्त साध्या बसनेच प्रवास करता येत होता. पण आता एसटी महामंडळाने शिवशाहीच्या स्लीपर, शिवनेरी आणि इतर सगळ्या लक्झरी बस मध्ये भाड्याच्या फरकाचे पैसे भरून तुम्हाला प्रवासाची मुभा दिली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा ४०,००० हून जास्त निवृत्त कर्मचारी ,अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभ होणार आहे.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More:  पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे नेण्यास सत्यजित तांबे यांचा विरोध!