पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे नेण्यास सत्यजित तांबे यांचा विरोध!

Nashik Today News : नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या आराखड्यामध्ये कुठलाही नवीन बदल नकरता तो, संगमनेर मधून नेण्याची मागणी सत्यजित तांबे यांनी निवेदनाद्वारे केली. प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे महामार्गाचा मूळ आराखड्यात बदल करत हा रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी आराखड्यानुसार हा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्याचे नियोजन केल जात आहे. पण मूळ आराखड्यानुसार हा रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना, या आराखड्यात बदल का केला गेला.

Nashik Today News about “Nashik to Pune” Railway Route Change!

नाशिक ते पुणे रेल्वे मार्गात बदल!

सत्यजित तांबे यांनी आराखड्यात बदल का केला गेला? हा प्रश्न उपस्थित केला, व शिर्डी मार्गे रेल्वे मार्ग नेण्यास विरोध केला. हा प्रश्न उपस्थित करत सत्यजित तांबे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. तसेच जुना आराखड्यानुसार रेल्वे मार्गामध्ये कुठलाही बदल न करता तो संगमनेर मधून येण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

नाशिक पुणे दोन महानगरांना जोडणारा रेल्वे मार्ग महारेल च्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातून नेण्याचे नियोजन केले होते. तसेच या रेल्वे मार्गामुळे तब्बल चार वसाहती जोडला जाणार आहे. म्हणजेच की पुण्यामधील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व मुसळगाव या चार वसाहती या रेल्वे मार्गामुळे जोडल्या जाणार आहे.

याचाच फायदा संगमनेर तालुक्यातील तरुणांना एक रोजगाराची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी यामधील काही कंपन्यांचे छोटी मोठी स्पेअर पार्ट नेण्यास मदत होईल. तसेच संगमनेर मधील फळे, भाजीपाला, धान्य महानगर मध्ये अधिक जलद पोचवले जाईल, तब्बल तीन दशकांनी संगमनेर तालुक्याचे नाव रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने त्यांचे सर्वांनी केल स्वागत. ही बाब माननीय आमदार तांबे साहेब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.

Nashik today news

असा निर्णय का घेतला ?

राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात रेल्वे मार्गासाठी भूसंपादनही केले आहे. फक्त एकट्या संगमनेर मधून तब्बल १०३ खरेदीखताद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केल्या आहे. हे सर्व केलेले असताना, अचानक मार्ग बदल करणे योग्य नाही मूळ आराखडा बदल करून रेल्वे प्रकल्प दुसऱ्या मार्गाने वळवणी सोपे आहे, का. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आधी पासून धावत आहे. तसेच नाशिक आणि शिर्डी एकमेकांना आधीपासून जोडलेले आहे, मात्र संगमनेर अद्याप गेल्या तीन शतकांपासून रेल्वेच्या नकाशावर नाही. त्यामुळे संगमनेर भागासाठी हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. राज्य सरकारकडे मुळा आराखड्यात कुठलाही बदल न करता हा मार्ग संगमनेर मागे न्यावा अशी मागणी माननीय आमदार तांबे साहेब यांनी केली आहे.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: Nashik today news

Leave a Comment