नाशकात सर्वात सुंदर गावाची घोषणा, या ‘२’ गावांची जिल्ह्यामधून झाली निवड!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Today News Marathi : नाशकात सर्वात सुंदर गावाची घोषणा, या ‘२’ गावांची जिल्ह्यामधून झाली निवड. आर. आर. (बाबा) पाटील सुंदर गाव योजनेत नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील कोकणखेडे गाव आणि निफाड तालुक्यातील तामसवाडी या दोन गावांची निवड झाली.

याबाबतची घोषणा नाशिक जिल्हा परिषदेकडून करण्यात आली असून. तसेच, कोकणखेडे गाव व तामसवाडी गाव या दोन्ही गावांची निवड झाली. म्हणून ४० लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार या दोन्ही गावांना विभागून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामविकास विभागांतर्गत २०१६ पासून महाराष्ट्र खेडेगावातील स्वच्छता, पर्यावरण व अन्य काही बाबी लक्षात घेता या दृष्टीने स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. पण ग्रामीण विकास माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सुंदर गाव असे नामांकन केले आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर गावाची निवड केली जाते.

या सुंदर गाव योजनेसाठी नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या नेमलेल्या समितीच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार २०२३ ते २०२४ करिता राज्य सरकारने जिल्हा परिषदेकडून तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित केला आहे. या योजनेमध्ये चांदवड तालुक्यातील कोकणखेडे गाव आणि निफाड तालुक्यातील तामसवाडी हे गाव सर्वात सुंदर म्हणून जाहीर केले आहे. तसेच, पंधरा तालुक्यातील प्रत्येकी एका गावाची तालुक्यास्तरावर निवड करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अशिमा मित्तल यांनी जाहीर केले आहे. तसेच तालुकास्तरीय गावाची निवड झाल्यास दहा लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

Nashik Today News

पारितोषिक मिळालेल्या रकमेतून होणारी ही कामे:

स्वच्छता संबंधित प्रकल्प, महिला सक्षमीकरण, अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प, महिलांसाठी अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, ग्रामपंचायत हद्दीत सौरऊर्जेचे लाईटीचे खांब उभे करणे, भौगोलिक माहिती प्रणाली बसवणे, सार्वजनिक जागेवर कोणी ताबा मिळू नये म्हणून तार कंपाऊंड उभारणे, व गावातील नागरिकांसाठी वाय-फाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी.

तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर मिळालेल्या पुरस्काराचे फळ म्हणजे सर्व सदस्य तसेच, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य यांच्या एकत्रीकरणामुळे सुंदर गाव योजनेमध्ये सहभाग नोंदवणे आणि निवडीसाठी आवश्यक कामे करण्यात आले. -सरपंच संदीप शिंदे कोकणखेडे, तालुका चांदवड.

तालुक्यातील सुंदर गाव:

तालुक्याचे नाव:गावाचे नाव:
चांदवडकोकणखेडे
निफाडतासमवाडी
सिन्नरबारागाव पिंपरी
बागलाणअंबासन
नाशिकलहवित
त्र्यंबकेश्वरपिंप्री (त्र्यं)
दिंडोरीजवळके वनी
इगतपुरीकुसेगाव
येवलाकोटमगावस (बु)
नांदगावजामदरी
पेठहरणगाव
मालेगावडाबली
देवळामेशी
कळवणतिह्यळ

हेही वाचा:

5 Sacred Local Temples in Trimbakeshwar You Must Visit to Dissolve Negativity!

अशाच नवनवीन माहिती व न्यूज जाणून घेण्यासाठी माझं नाशिक कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा.

Leave a Comment