Nashik Rahad Rangpanchami 2024 | नाशिकची पेशवेकालीन रहाड संस्कृती म्हणजे काय? जाणून घ्या पेशवेकालीन रहाड चा इतिहास


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Rahad Rangpanchami 2024: नाशिकची पेशवेकालीन रहाड संस्कृती म्हणजे काय? जाणून घ्या पेशवेकालीन रडता चा इतिहास नाशिक मधील रंगपंचमीची परंपरा बघायला गेले तर आगळीवेगळी परंपरा आहे.तसेच, रंगपंचमी प्रेमी पेशवेकालीन रहाडीत डुबकी मारत ही रंगपंचमी साजरी करतात. हा रहाडीचा इतिहास पेशवेकाळापासून चालत आलेला आहे.

Nashik Rahad Rangpanchami 2024

नाशिक रहाड रंगपंचमी 2024

बघायला गेल तर सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजेच या दिवशी रंग खेळला जातो. परंतु नाशिकमध्ये आगळीवेगळी रंगपंचमीची परंपरा आहे. होळी झाल्यानंतर लगबघ पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते अशी, ही पेशवेकालीन परंपरा आहे. तसेच, यावेळेस पेशवेकालीन रहाडी खुल्या होत असल्याने नाशिककर रंगपंचमीची आतुरतेने वाट पाहत असतात तसेच आज दि. ३०/३/२०२४ साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चला तर मग आपण जाणून घेऊया नाशिकच्या पेशवकालीन रहाडचा इतिहास….

पूर्वीच्या काळी पैलवानांची शक्ती प्रदर्शन करणारी जागा म्हणजेच की रहाड मानली जात होती. तसेच या रहाडीमध्ये पूर्वीच्या काळी कुस्तीचे सामने देखील राहायचे कुस्तीच्या सामन्याच्या योजनांमुळे रहाड या ठिकाणी हाणामाऱ्या होत असल्या कारणाने रहाड हा शब्द प्रचलित झाला असावा आणि त्यानंतर रहाड हा शब्द नाशिककरांच्या मनावर कोरलेला गेला आहे. तसेच ही पेशवकालीन रहाडची संस्कृती अजूनही शिल्लक आहे.

Dande Hanuman Rahad – Color Yellow

दंडे हनुमान – रंग पिवळा

नाशकातील काजीपुरा पोलीस चौकी परिसरात पेशवेकालीन तीनशे वर्षांपूर्वीची दंडे हनुमान रहाड अजूनही आहे. पूर्वीच्या काळात येथे बैलगाडीवरून मोठमोठी पाण्याचे टीप, पाण्याच्या टाक्यातून, रंगपंचमी साजरी केली जात असायची. तसेच दंड हनुमान या रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो बघायला गेलं तर तब्बल २०० किलो हून अधिक फुलांचा एकत्रितकरण करून रंग तयार केला जातो.

Shani Chowk Rahad – Color Pink

शनी चौक रहाड – रंग गुलाबी

पंचवटी परिसरातील पेशवे कालीन शनि चौकातली रहाड आजही प्रसिद्ध आहे. या, शनि चौक परिसरात पेशव्यांचे सरदार वास्तव्यास होते. त्याकाळी ही रहाड कुस्त्या खेळण्यासाठी वापरली जायची व या रहाडीची देखभाल रास्ते सरदार करत असे, असे सांगण्यात येते. या शनि चौकातील शनि चौक मित्र मंडळ हे आजही या रहाडीची जपवणूक करत आहे. तसेच या रहाडीची पूजा दीक्षित घराण्यातील मानकरी रहाडीची पूजा करतात व या शनि चौकीतील रहाडीचा रंग गुलाबी आहे.

Tambat Lane Rahad – Color Orange

तांबट लेन रहाड – रंग केशरी

तांबट लेनमधील ही रहाड पेशवेकालीन दगडाच्या बांधकामात तयार केली आहे. तांबट लेनमधील या रहाडी कडे गेल्या काही वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती. तांबटलेंन मधील तरुणांनी एकत्र येत ही पेशवेकालीन रहाड खुली केली. या पेशवेकालीन रहाडीचा रंग केसरी आहे. तसेच, रंगपंचमीच्या दिवशी तांबटलेन राडीचा पूजा करण्याचा मान पाच कुटुंबीयांना दिला जातो. तसेच या रहाडीचा रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले, तुळस तसेच चंदनाचा वापर केला जातो.

हेही वाचा:

नाशकात सर्वात सुंदर गावाची घोषणा, या ‘२’ गावांची जिल्ह्यामधून झाली निवड!

अशाच नवनवीन माहिती व न्यूज जाणून घेण्यासाठी माझं नाशिक कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा.