राज्यातील पहिले (AC) वातानुकूलित एसटी बस स्थानक नाशिक मध्ये!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Mela Bus Stand Nashik : महाराष्ट्र राज्यातील पहिले ए सी मेळा बस स्थानकाचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.

Mela Bus Stand Nashik

मेळा बस स्थानकाचे नाशिक करांना होणारे फायदे!

ठक्कर बस स्थानकालगत असणारी १.७३ हेक्टर जागेमध्ये असलेल्या बस स्थानकात ६०३३.२२ चौरस मीटर इतकी इमारत उभारण्यात आली आहे. तसेच नागरिकांना प्रवेशासाठी स्वातंत्र्य प्रवेशद्वार करण्यात आले आहे. तसेच या बस स्थानकाचा तळघरात प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळा बस स्थानकात एकून २० फलाट असून यापैकी ४ फलाट वातानुकूलित करण्यात आलेले आहेत. तसेच नाशिक मधील या बस स्थानकामध्ये चालक व वाहक तसेच महिला व पुरुष यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे.

मातांना आपल्या लहान बाळाची काळजी घेता यावी म्हणून, यांसाठी स्वतंत्र असे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे. तसेच येथे कार्यरत असलेल्या MSRTC च्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामासाठी स्वतंत्र असे विश्रामगृह देखील तयार करण्यात आले आहे या मेळा बस स्थानकात (Mela Bus Stand Nashik) अपंग व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. असून, अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रसाधान गृह देखील उभारण्यात आले आहेत. या बस स्थानकाच्या संपूर्ण आवारामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

Mela Bus Sthanak Facilities

मेळा बस स्थानकात असणाऱ्या सुविधा

मेळा बस स्थानकात स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, नागरिकांना सोईस्करपणे उपहार करता यावा म्हणून यासाठी उपहारगृह, पार्सल पॉईंट, तसेच सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा तयार करण्यात आली आहेत. या मेळा आधुनिक बस स्थानकामुळे नाशिक शहराच्या लौकिकात वाढ होईल, असा दावा नाशिक मध्ये माननीय मतदार संघाचे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला.

अशाच नाशिक जिल्ह्यातील ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: Dr Kailash Rathi Nashik Attack

Leave a Comment