नाशिकमध्ये मोहिमे दरम्यान ५०० हून अधिक रिक्षा चालकांना ठोठावला दंड..!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Auto Driver News: मोहिमे दरम्यान विना परवाना रिक्षा चालकांना पोलीस आयुक्त संदीप करनाईक यांच्या निदर्शनाखाली ५०० हून अधिक रिक्षा चालकांना ठोठावला दंड..!

नाशिकसमोर उभे ठाकले स्वाईन फ्लू चे नवीन संकट!

नाशिक: नाशिक शहर पोलिसांनी शहरातील शालिमार आणि रविवार कारंजा परिसरात रिक्षाचालकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झालेली ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेकायदेशीर पार्किंग, ऑटोरिक्षात परवानगीपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे, वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसणे इत्यादी कारणांमुळे पोलिसांनी अंदाजे ५०० हून अधिक ऑटोचालकांना दंड ठोठावला असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील शालिमार आणि रविवार कारंजा परिसरात वाहनांची अस्ताव्यस्त वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्नाईक यांनी त्यांच्या पथकाला चुकीच्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यास सांगितले होते.

आजची मोठी बातमी! या तारखेला होणार दहावीचा निकाल जाहीर…

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!