श्री कपालेश्वर मंदिर नाशिक येथे शंकराने नंदीला गुरुस्थान का दिले?


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Shree Kapaleshwar Mahadev Mandir Nashik: श्री कपालेश्वर मंदिर नाशिक त्रैलोक्यातील ( स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तीन लोक )असे एकमेव मंदिर येथे भगवान शंकराने आपल्या सेवकाला म्हणजेच नंदीला गुरुस्थान दिले. भगवान शंकरांवर असलेल्या ब्रह्महत्तेच्या पातकावर मुक्तीचा मार्ग भगवान शंकरांना महानंदीच्या मुखातून प्राप्त झाल्याने भगवान शंकराने नंदीला येथे गुरुस्थान दिले आहे. म्हणून श्री कपालेश्वर मंदिरात शिवलिंगासमोर नंदी नाही. कोट्यावधी हत्तेच्या पातकाचा नाश श्री कपालेश्वरच्या दर्शनाने होतो. तसेच बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिळणारे पुण्य एकट्या श्री कपालेश्वर लिंगाच्या दर्शनाने मिळते.

Shree Kapaleshwar Mahadev Mandir Nashik Mystry

भगवान शंकरावर ब्रम्हहत्येचे पातक कसे लागले?

पदमपुरणात श्री मार्कंडेय मुनिश्रेष्ठ सांगतात की पूर्वी ब्रह्मदेवास पाच मुखे होती. चार मुखांनी ब्रह्मदेव वेदपठण व पाचव्या मुखाने श्रीविष्णूची निंदा करीत असत. एकदा देवसभेत विष्णूनिंदेबरोबर ब्रम्हदेवाने भगवान शंकराची ही निंदा सुरू केली आणि हे बघून भगवान शंकरांना क्रोध अनावर झाला. रजोगुणी ब्रह्मदेवाच्या हातातील ब्रम्हास्त्र भगवान शंकरांनी हिसकावून घेतले व त्या ब्रम्हास्त्रनेच निंदा करणारे ब्रम्हदेवाचे पाचवे मुख धडापासून वेगळे केले अशाप्रकारे भगवान शंकरांवर ब्रम्हहत्येचे पातक लागले.

Shree Kapaleshwar Temple Nashik History in Marathi

भगवान शंकरांना नंदिने ब्रम्हहत्येचे पातकातून मुक्तीचा मार्ग कसा सांगितला?

भगवान शंकरांनी ब्रम्हादेवाचे पाचवे मुख धडापासून वेगळे केले देवांना आनंद झाला परंतु भगवान शंकर मात्र खेदाने खिन्न झाले विष्णू निंदकास हा दंड योग्यच आहे पण मला ब्रम्हहत्येचे पातक दूर व्रत करणे आवश्यक आहे असा विचार करून भगवान शंकराने  खटांगावर ते ब्रम्हकपाळ ठेवले व भारतातील उत्तरेकडील अनेक तीर्थयात्रा केल्या परंतु पातकाचे निरसन झाले नाही.

दुःखी कष्टी होऊन भगवान शंकर दक्षिणेकडे वळाले. तीर्थयात्रा करीत असताना ते पंचवटी देवशर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी ओट्यावर विश्रांतीसाठी थांबले असता तेथे मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यातील गाय व गोर्‍हा ( नंदी ) यांचा संवाद चालू होता ती गाय व वासरू पूर्वजन्मीचे ज्ञानी होते वासरू गाईस सांगत होते की, तू म्हणतेस की देव शर्मा आपला धर्मपिता आहे परंतु याने मला जन्मापासून फार पिडा दिली आहे या दृष्टाचा मी वद करीनच उद्या सकाळी तो माझ्या नाकात व्यसन घालणार आहे.

त्याचवेळी माझ्या शिंगाने मी त्यास ठार करीन मला ब्रम्हहत्येचे पातक घडेल परंतु तू चिंता करू नकोस त्या पातकाच्या क्षालनाचा मार्ग मला माहित आहे तू कष्टी होऊ नकोस कदाचित तू म्हणशील की भगवान शंकर  देखील १२ वर्षांपासून ब्रह्महत्येच्या पातकाचे निवारण शोधत आहे तरी अजून मुक्त झाले नाहीत तर त्याचे कारण शंकर तमोगुण विशिष्ट असून क्रोधाच्या भरात त्यांचे बुद्धीवर सावट आले आहे व नाशिक पंचवटी क्षेत्राचा महिमा त्यांच्या स्मरणातून गेला आहे. त्यातून भगवान शंकराने जे कृत्य केले ते लोकांस वळण लागावे या हेतूनेच केले आहे तसे पाहिले तर भगवान शंकर सर्व पातकांचा नाश करणारे आहेत.

गाय वासरातील हे संभाषण ऐकून भगवान शंकरास परम संतोष झाला. आपला मार्गदर्शक गुरु आपणास आज मिळाला तरी आजची रात्र येथेच राहून सकाळच्या क्षणाची वाट पाहत राहिले. सकाळी ठरल्याप्रमाणे त्या बैलाचे नाक टोचण्यासाठी देवशर्मा ब्राह्मण खटपटीत असतात त्या बैलाने आपल्या बांधलेले पाश तोडून टाकले व स्वतःला सोडून घेतले शिंग ब्राह्मणाचे पोटात खूपसले देवशर्मा जागीच गतप्राण झाला ब्राह्मण हत्येचा परिणाम म्हणून तो पांढराशुभ्र नंदी काळा ठिक्कर पडला पंचवटीत अरुणा वरुणा संगमात जाऊन त्याने पाण्यात उडी घेतली त्याचा देह पूर्ववत झाला नंतर श्रीराम  दर्शनाने तो अतिशय तेजस्वी व बलवान झाला भगवान शंकराने देखील त्याच मार्गाने आचरण केले.

श्री कपालेश्वर मंदिर नाशिक येथे नंदी विरहित शिवलिंग का आहे?

नंदिनी सांगितलेल्या मार्गाने भगवान भगवान शंकराने आचरण केले व ब्रह्महत्तेच्या पातकातून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर श्रीरामाचे दर्शन घेऊन जेथे सध्या लिंग आहे त्या टेकडावर शंकर समाधानाने येऊन बसले असता आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली व साक्षात विष्णू सर्व देवांसह अवतीर्ण झाले व त्यांचे समक्ष ते ब्रह्मकपाळ काठीवरून खाली पडले सर्व देवांनी भगवान शंकरांचा जयजयकार केला अशा रीतीने शंकर ब्रह्महत्तेच्या पातकापासून  मुक्त झाले याच ठिकाणी विष्णू ने स्वस्ते लिंगाची स्थापना केली.

विष्णू म्हणाले शिवलिंग ‘कपालेश्वर ‘नावाने प्रसिद्ध होईल व त्याच्या दर्शनाने मानवया महापातकाचा नाश होईल. महानंदीच्या मुखातून महामुक्तीचा मार्ग भगवान शंकरांना येथे प्राप्त झाल्याने शंकराने येथे नंदीला गुरुचा मान दिला आहे. गुरु शिष्याचा महिमा वाढवीत असतो “गुरु-शिष्याचा महिमा न कळे कोणासी ,यासाठी या लिंगासमोर नंदीची स्थापना नाही.” नाशिक पंचवटी सारखे तीर्थक्षेत्र सानिध्य वाहणारे गौतमी गोदावरी व विष्णूच्या हस्ते स्थापना असे नंदी विरहित कपालेश्वर महादेवाचे स्थान महासिद्धी देणारे होईल.

मानवास भक्ती देणारे होईल म्हणून त्याची महती त्रैलोक्यात राहील कोट्यावधी हत्येच्या पातकाचा नाश् दर्शनाने होईल बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने मिळणारे पुण्य एकट्या कपालेश्वर लिंगाच्या दर्शनाने होईल या पुरातन प्रसिद्ध कपालेश्वराचे नित्य दर्शन इंद्र व रामही करतात असा अगाध महिमा आहे श्री कपालेश्वर महादेवाचा.

Who Built Kapaleshwar Mandir (Temple) In Nashik?

क्ष्री कपालेश्वर मंदिराचे बांधकाम कोणी केले?

भारतातील नाशिकमधील कपालेश्वर मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. मंदिराच्या बांधकामाचे श्रेय पेशव्यांच्या सरदार ओढेकर नावाच्या मराठा शासकाला दिले जाते. हे मंदिर त्याच्या अद्वितीय वास्तुकला आणि रामकुंडा नावाच्या पवित्र कुंडासाठी ओळखले जाते, जे कुंभमेळ्यादरम्यान पाळल्या जाणार्‍या धार्मिक समारंभांमध्ये महत्त्व देते, जो एक महत्त्वपूर्ण हिंदू उत्सव आहे.

नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. विशिष्ट ऐतिहासिक नोंदी अपूर्ण असल्या तरी, मंदिराला या परिसरात आणि संपूर्ण भारतात सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

Shree Kapaleshwar Mahadev Mandir Genral Overview

क्ष्री कपालेश्वर मंदिर नाशिक बद्दल सविस्तर

प्राचीन इतिहास:

भारतातील प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या नाशिकला हिंदू पौराणिक कथांशी खोलवर जोडलेला इतिहास आहे. असे मानले जाते की हिंदू महाकाव्य रामायणातील मध्यवर्ती पात्र भगवान राम यांनी त्यांच्या वनवासात काही काळ नाशिकमध्ये घालवला होता.

मंदिराचे बांधकाम:

क्ष्री कपालेश्वर मंदिर नाशिक हे 18 व्या शतकात पेशव्यांशी संबंधित मराठा शासक सरदार ओढेकर यांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बांधकामाची अचूक तारीख आणि इतर पुरेशी माहिती अजूनही अज्ञात आहे अजूनही ती मिळालेली नाही परंतु मंदिर त्या काळात मराठा स्थापत्य आणि धार्मिक संरक्षणाचा पुरावा म्हणून उभे आहे.

वास्तुशिल्प वैशिष्ट्ये:

मंदिर विस्तृत कोरीव काम आणि शिल्पांसह पारंपारिक मराठा वास्तुकला प्रदर्शित करते. गर्भगृहात शिवलिंग आहे आणि मंदिराच्या संकुलात विविध देवतांना समर्पित इतर मंदिरे आहेत.

रामकुंड:

हे मंदिर पवित्र रामकुंडाजवळ आहे. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यात रामकुंडावर स्नान केले तर ते पवित्र मानले जाते, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी एकत्र येऊन विविध धार्मिक उत्साहात सहभागी होतात आणि आध्यात्मिक शुद्धी साधतात.विविध धार्मिक विधी करण्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी देशभरातील यात्रेकरू येथे जमतात.

धार्मिक महत्त्व:

क्ष्री कपालेश्वर मंदिर हे भगवान शिव भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करते जे तिथल्या धार्मिक वातावरणाचा आणि स्थापत्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.

भारतातील इतर काही प्राचीन मंदिरांप्रमाणे ऐतिहासिक तपशिल मिळाले नसले तरी कपालेश्वर मंदिराचे नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशात महत्त्वपूर्ण महत्त्व आहे. हे भारताच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचे, अध्यात्म आणि स्थापत्य परंपरेचे प्रतिनिधित्व करते.

Shree Kapaleshwar Mahadev Mandir Photos

श्री कपालेश्वर महादेव मंदिर नाशिक फोटोज

Shree Kapaleshwar Mahadev Mandir Photos
Shree Kapaleshwar Mahadev Mandir Nashik Photos

आम्ही आशा करतो की आपल्याला श्री कपालेश्वर महादेव मंदिर नाशिक या ऐतिहासिक स्थळाबद्दल पुरेशी माहिती मिळाली असावी आपल्याला हा लेख जर आवडल्यास तो इतरांना नक्की शेअर करा ज्यामुळे आपल्या नाशिकच्या पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांबद्दल इतर लोकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहचली जाईल.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: Kaal Sarp Dosh Puja In Nasik Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर नाशिक येथील काल सर्प दोष पूजेचे हे… आहे फायदे!

माझं नाशिक: मी नाशिककर, माझं नाशिक माझा अभिमान…….!!

FAQ: Shree Kapaleshwar Mahadev Mandir Nashik

How can one reach Shree Kapaleshwar Mahadev Mandir?

The temple is easily accessible by road. Visitors can use public transportation or hire private vehicles. Nashik has good connectivity, and detailed directions can be obtained locally.

Is the temple open throughout the year?

While the temple is generally open throughout the year, it’s advisable to check for any temporary closures or special events that might affect regular visiting hours.

Are there any nearby accommodations for visitors?

Nashik offers a range of accommodation options to suit different budgets. From hotels to guesthouses, visitors can find comfortable places to stay in close proximity to the temple.

Leave a Comment