या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलाच पाहिजे!


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

केंद्रसरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत असतात. त्यापैकीच या काही योजना आहेत त्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतलाच पाहिजे!

Schemes For Farmers In India | शेतकऱ्यांना पेरणी कापणी अशा विविध कामांसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. पण या योजनांची माहिती काही वेळेस शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात जेणेकरून ते कठीण काळात सुद्धा शेती करू शकतील. केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांपैकी या तीन योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. या योजनांचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते. योजनांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे येतात.

Schemes For Farmers In India Information

Schemes For Farmers In India  बद्दल माहिती

पंतप्रधान पिक विमा योजना

केंद्रीय सरकारच्या योजनांपैकी एक प्रमुख योजना म्हणजे पंतप्रधान पिक विमा योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणांमुळे शेतकऱ्यांचे पीक गेले नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करते. अधिक माहितीसाठी http://krishi.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड ही देखील एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना 1998 पासून सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दराने साधारणतः तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. आत्तापर्यंत या योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी शेतकर्यांनी घेतला आहे. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी या http://krishi.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्या.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान ही देखील केंद्र सरकारची योजना आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजारांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा होते. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळते. प्रत्येक चार महिन्यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://krishi.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि योजनेसाठी अर्ज करा.