नाशिक चा “नवश्या गणपती” त्याचा पेशवेकालीन इतिहास तुम्हाला माहित आहे का ?


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Navshya Ganpati Nashik: नाशिक चा “नवश्या गणपती” त्याचा पेशवेकालीन इतिहास आणि संपूर्ण माहिती .

Navshya Ganpati Nashik Information

नवश्या गणपती नाशिक माहिती

नाशिक शहरातील आनंदवल्लीभागात सुप्रसिद्ध श्री नवश्या गणपती मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीला “नवश्या गणपती” म्हणतात हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणापासून केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती अतिशय आकर्षक आहे ही गणेशाची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुज आहे. ह्या मूर्तीच्या हातात फुले, पाश, मोदक तर एक हात अभय मुद्रेत म्हणजेच आशीर्वाद देण्यासाठी आहे. या मूर्तीच्या मागील बाजूस चांदीचा मखर आहे.

ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे नवस मागण्यासाठी येतात. येथे नवस पूर्ण झाल्यावर मंदिरात घंटा बांधण्याची परंपरा आहे. हे मंदिर भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर) या हिंदू महिन्यात साजरा होणाऱ्या वार्षिक उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भक्त गणपतीबाप्पाला मोदक , फुले आणि नारळांसह विविध नैवेद्य देतात.

नवश्या गणपती मंदीर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. नवश्या गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ ‘हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद’ यांची दरगाह आहे.

या मंदिराच्या आजूबाजूला असलेली दाट झाडी ,त्याला लागूनच असलेलं नदीपात्र ,येथील शांतता यामुळे भाविकांना बरोबरच या पर्यटकही या मंदिराकडे आकर्षित होतात.

Navshya Ganpati Nashik History

नवश्या गणपती नाशिक चा इतिहास

नाशिक शहरातील “नवश्या गणपती” हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. हे अत्यंत जुने पेशवेकालीन मंदिर आहे. पेशवे काळात राघोबा पेशवे ( श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज) पत्नी आनंदीबाई या पुण्यातील शनिवार वाड्याहून नाशिकला आल्या. नाशिक हे आनंदीबाई यांचे आजोळ असल्याने त्यांनी इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

या दरम्यान आनंदीबाई यांनी गणपतीला नवस केला की मला मुलगा झाला तर मी मंदिराची स्थापना करेल. नवस केल्याप्रमाणे आनंदीबाई यांना मुलगा झाला. या मुलाचे नाव विनायक ठेवले आणि नवस केल्याप्रमाणे आनंदीबाई आणि राघोबा पेशवे यांनी इसवी सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात या ठिकाणी गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून “नवश्या गणपती”असे नाव पडले.

आनंदीबाई व राघोबा पेशवे यांना मुलगा झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झालेले होते त्यावेळी या गावाचे नाव चावंडस असे बोलण्याचे सांगितले जाते. त्यावेळी आनंदीबाई यांच्या नावावरून या गावाला “आनंदवल्ली”असे नाव देण्यात आले होते व ते नाव आजपर्यंत टिकून आहे. त्यानंतर राघोबा पेशवे यांनी आनंदवल्ली या ठिकाणी मोठा राजवाडा ही बांधला. राघोबा पेशवे यांनी या वाड्याची बांधणी अशी केली होती की या वाड्याच्या पश्चिम दिशेला उभे राहिल्यास नवशा गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई संपल्यानंतर हा राजवाडा ही जाळण्यात आला. मात्र या राजवाड्याच्या परिसरातील नवशा गणपतीचे मंदिर आज ही शाबुत राहिले.

त्यानंतर आपल्या देशावर इंग्रजांचे आक्रमण झाले आणि अनेक मंदिरांची नासधुस करण्यात आली व या नासधुसी मध्ये आनंदवल्ली चा पेशवेकालीन वाडाही जाळण्यात आला. त्यामुळे नवश्या गणपती मंदिर हे अनेक वर्ष दुर्लक्षित राहिले. त्यानंतर १९८५ साली आनंदवल्लीचे नागरिक युवराज जाधव आणि इतर गावकऱ्यांनी मिळून हे मंदिर शोधून काढले आणि त्यानंतर ह्या मंदिराची डागडुजी करण्यात आली.

Navshya Ganpati Nashik Images

नवश्या गणपती नाशिक चित्रे

Navshya Ganpati Nashik

Navshya Ganpati Nashik Address

नवश्या गणपती नाशिक पत्ता

 2P8V+H75,नवशा गणपती परिसर, पेशवे कॉलनी ,आनंदवल्ली ,नाशिक महाराष्ट्र – 422013

Navshya Ganpati Nashik Time

नवश्या गणपती नाशिक वेळ

सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत

Navshya Ganpati Nashik Contact Number

नवश्या गणपती नाशिक संपर्क क्रमांक

तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता
98194 32999

Navshya Ganpati Nashik Location

नवश्या गणपती नाशिक लोकेशन

Navshya Ganpati Nashik

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: नाशिकचं सौंदर्य “सुला व्हिनयार्ड्स” चा अनुभव तुम्ही घेतला का?

FAQ: Navshya Ganpati Nashik

What is Navshya Ganpati in Nashik?

Navshya Ganpati, nestled in Nashik, Maharashtra, India, stands as a revered sanctuary devoted to Lord Ganesh. Esteemed for its cultural and religious significance, it draws devout followers seeking spiritual blessings.

Where is Navshya Ganpati situated in Nashik?

The temple stands in Navshya Ganapati Parisar, nestled within the serene enclave of Peshwe Colony, Anandvalli, Nashik, Maharashtra 422013.

What is the significance of Navshya Ganpati?

Navshya Ganpati is believed to be the “Navsacha Ganpati,” which means the fulfiller of all wishes. Devotees visit this temple to seek blessings for prosperity, success, and the removal of obstacles from their lives.

What are the temple timings of Navshya Ganpati?

The temple timings for Navshya Ganpati are from 6 am to 10 pm, allowing ample time for devotees to visit and offer prayers throughout the day.

Is there any special ritual or festival associated with Navshya Ganpati?

The Navshya Ganpati temple comes alive with vibrant celebrations during Ganesh Chaturthi. Devotees gather to partake in intricate rituals, heartfelt prayers, and engaging cultural events, creating a spirited atmosphere that resonates with reverence and joy.

Can we perform any specific pooja or ritual at Navshya Ganpati for a particular wish?

Certainly, the temple priests conduct a variety of pujas and rituals based on devotees’ requests. Specific rituals and pujas are advised for different wishes or desires. Devotees are encouraged to seek guidance from the temple authorities for assistance in selecting the appropriate ones.

Is there any accommodation available near Navshya Ganpati for devotees?

Absolutely, there’s a diverse range of lodging choices in close proximity to the Navshya Ganpati temple, catering to various budgets and preferences. Whether you’re seeking budget-friendly hotels or cozy guesthouses, visitors have a plethora of options to select from.

Are there any nearby attractions to visit along with Navshya Ganpati?

Yes, besides Navshya Ganpati, Nashik boasts numerous other attractions nearby that are worth exploring. These include the sacred Ram Kund, the majestic Kalaram Temple, the serene Sita Gufa, and the revered Trimbakeshwar Temple, all adding to the charm of this vibrant city.

Leave a Comment