हे ५ अन्नपदार्थ कॅन्सर टाळू शकता…


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

5 Foods That Prevent Cancer | आपले दररोज खाल्ले जाणारे काही अन्न पदार्थ कॅन्सरला रोखु शकता या अन्नपदार्थांमध्ये मूलतः अँटी कॅन्सर गुणधर्म असतात. त्यापैकीच हे सहा अन्नपदार्थ जे खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे.

उन्हाळ्यात या 5 टिप्स फॉलो कराल तर निरोगी रहाल!

5 Foods That Prevent Cancer: एक भयंकर आणि प्राणघातक आजार म्हणजे कॅन्सर. कॅन्सरवर जगभरात अनेक उपचार आहेत. परंतु कॅन्सर जगातील मृत्यूचे कारण आहे. तज्ञांचे असे म्हणणे आहे, की कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे योग्य वेळी ओळखून त्यावर उपचार करता येऊ शकता. कॅन्सर असो किंवा इतर कोणताही आजार प्रत्येकामध्ये सकस आहाराची महत्त्वाची भूमिका असते.

यामुळे अनेकांना हे जाणून घ्यायचे असते की कॅन्सर टाळण्यासाठी कोणते अन्नपदार्थ खावे? कोणत्याही आजाराशी लढा देणे, टाळणे किंवा बरे होणे यासाठी आहाराचे महत्त्वाची भूमिका असते. त्यापैकीच हे सहा अन्नपदार्थ जे खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे.

तज्ञांना संशोधनात असे आढळून आले की आपण आपले दररोज खाल्ले जाणारे काही अन्न पदार्थ कॅन्सरला रोखु शकता या अन्नपदार्थांमध्ये मूलतः अँटी कॅन्सर गुणधर्म असतात. अनेक संशोधक असा दावा करतात की रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्याची क्षमता असते.

काळी द्राक्षे (Black grapes)

तुम्हाला जर कॅन्सरपासून संरक्षण हवे असेल तर तुम्ही काळी द्राक्ष खाण्यास सुरुवात करायला हवी.
कारण या द्राक्षांमध्ये सुपर अँटीऑक्सिडंट ऍक्टिनने भरलेल्या बिया असतात.

रेड वाइन आणि काळ्या द्राक्षांच्या ज्यूस मध्ये देखील आढळणारे हे कॅन्सरशी लढणारे गुणधर्म विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर, हृदयरोग आणि इतर जुनाट आजारांपासून महत्त्वपूर्ण संरक्षण देऊ शकतात.

ब्रोकोली (Broccoli)

अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले की, ब्रोकोली मध्ये सुद्धा अँटिकॅन्सर गुणधर्म असतात. ब्रोकोली मध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतात.

फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेली ब्रोकोली कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते. ब्रोकोलीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही ती उकळून शकता.

मासे (fish)

सॅल्मन, ट्यूना आणि हेरिंगसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे प्रमाण जास्त असते. हे एक प्रकारचे फॅटी ऍसिडआहे जे कॅन्सर रोखण्यासाठी मदत करते. जर तुम्ही मासे खात नसाल तर कॅन्सल टाळण्यासाठी मासे खाण्याचा विचार नक्की करा.

लसूण व कांदा (Garlic and Onion)

लसूण आणि कांद्यामध्ये नायट्रोसामाइन्सच्या निर्मितीला प्रतिबंध करू शकता असे अनेक संशोधनामध्ये आढळून आले आहे. हे कार्सिनोजेनिक घटक आहेत जे शरीराच्या अनेक भागांवर विशेषतः पोट यकृत आणि स्तनांवर परिणाम करतात. किंवा लसूण आणि कांदा जितका तिखट असेल तितका त्यात रासायनिकदृष्ट्या सक्रिय सल्फर संयुगे जास्त प्रमाणात असतात जी कॅन्सरला कॅन्सरला प्रतिबंध करता.

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी च्या पानांमध्ये आढळणारी कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडेंट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. असे संशोधनात आढळून आले आहे.

कॅटेचिन ट्यूमर कमी करू शकतात. हे कॅटेचिन ग्रीन आणि ब्लॅक टी मध्ये आढळून येतात. पण ग्रीन टी मधून जास्त अँटिऑक्सिडंट त्यासाठी तुम्ही रोज एक कप ग्रीन टी पिला पाहिजे.

सुट्टीच्या गृहपाठासाठी कल्पना शोधत आहात?

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!