Nashik news today Marathi : नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यात बहरते स्ट्रॉबेरी आदिवासी बांधवांना रोजगाराचा नवीन मार्ग (Strawberry blooms in the tribal belt of Nashik!)
Strawberries bloom in Nashik
नाशिकमध्ये स्ट्रॉबेरी बहरली
लाल चटक व तोंडाला पाणी आणणारी स्ट्रॉबेरी सध्या मार्केटमध्ये चांगलाच भाव घेत आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण अजून काही तालुक्यात शेतकरी बांधवांनी स्ट्रॉबेरीची मोठी लागवड केलेली दिसून, येत आहे त्यामुळे पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यातील आदिवासी बांधवांना रोजगाराचा नवीन मार्ग मिळाला.
सुरगाणा व कळवण या दोन तालुक्यातील काही भागात लावलेली पिके, फळे व रानभाज्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आकर्षण बनलेल्या दिसून येत आहे. त्यामध्ये रस्त्याला लावलेली छोटी-छोटी दुकानातील लाल चटक स्ट्रॉबेरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच या लाल चटक स्ट्रॉबेरीने शेतकरी बांधवांना व छोटी मोठी विक्रेतांना चांगलाच आधार दिला आहे. नाशिक तालुक्यात काही भागात थंडीच्या हंगामात स्ट्रॉबेरीचे लाल चटक पिक अजूनच बहरते दिसून येत आहे. लालसर गुलाबी रंगाची, गोड आंबट, चवीची स्ट्रॉबेरी पाहिल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल अशी तिच्या हंगामात आरोग्यदायी असणारी स्टोबेरी चांगलाच भाव घेत आहे.

अशाच नाशिक जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
Read More :
नाशिकरांसाठी आनंदाची बातमी नाशिक बोरिवली MSRTC ई – बस सेवा सुरू!
राज्यातील पहिले (AC) वातानुकूलित एसटी बस स्थानक नाशिक मध्ये!