अयोध्या, काशी, हरिद्वार नंतर “गंगा आरती” होतेय आता नाशकात!

अयोध्या, काशी, हरिद्वार नंतर “गंगा आरती” (Ganga Aarti Nashik )होतेय आता नाशकात ! वाचा संपूर्ण

Ganga Aarti Nashik Information

गंगा आरती नाशिक माहिती

तुम्ही हरिद्वार, काशी (वाराणसी)आणि अयोध्या येथील गंगा आरती पाहिली असेल आत्ता तशीच गोदावरी नदीची ही आरती करण्याचा राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या प्रकल्पात आरती साठी लागणारे प्लॅटफॉर्म, भाविकांसाठी गॅलरी तसेच रामकुंडावरील सुशोभीकरण इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. रामकुंडावर होणारी गोदावरी महाआरती ही अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण रामकुंडावर भाविक भक्तांसह पर्यटक सुद्धा येतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ही आरती महत्त्वाची असणार आहे. वाराणसी, हरिद्वार आणि अयोध्या यांच्या धर्तीवर होणाऱ्या या महाआरतीमुळे गोदावरीचे अजून महत्त्व वाढणार आहे. तसेच या महाआरती मुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. १९ फेब्रुवारी पासून रोज सायंकाळी ही महाआरती सुरु करण्यात आली आहे.

Ganga Aarti Nashik Form

गंगा आरती नाशिक स्वरूप

गंगा आरतीचं स्वरूप वाराणसीतील गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या पारंपारिक आरती सारखेच आहे. या आरतीत पुरोहितांकडून धुप आरती, दिप आरती तसेच गोदावरी नदीला नैवेद्य अर्पण करण्यात येतो. त्यानंतर मंत्र पुष्पांजली आरती करण्यात येते. या आरतीचे डमरू वादन आणि शंखनाद हे प्रमुख आकर्षण ठरतात. यावेळी आरती करणारे पुरोहित एक विशिष्ट पोशाख घालतात.

गंगा आरती हा केवळ विधी नाही तर ही एक आस्था आहे. दररोज संध्याकाळी जसजसा सूर्य मावळायला लागतो तसतशी रामकुंडावरची लगबग वाढते. ही मनमोहन टाकणारी आरती बघण्यासाठी रामकुंडावर गर्दी होते. जसजसे दिवे लागतात आणि मंत्रोच्चारणांचा आवाज घुमतो तशी भाविकांची उचुकता अजूनच वाढते. ते लयबद्ध मंत्र आणि लखलखीत दिव्यांचा प्रकाश वातावरण प्रसन्न करतात. ह्या वातावरणात आवाज करत वाहणारी गोदावरी अजूनच भर घालते. गंगा गोदावरी आरती आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम आपल्याला इथे बघायला मिळतो.

Ganga Aarti Nashik Timing

गंगा आरती नाशिक वेळ

गंगा आरती ही दररोज संध्याकाळी ७ वाजता केली जाते.

ganga aarti nashik Duration

गंगा आरती नाशिक कालावधी

या आरतीचा कालावधी साधारणपणे ३० ते ४५ मिनिटांचा असतो. या वेळेत धूप आरती, दिप आरती, मंत्रोच्चारण यासारखे इतर विधी पार पाडले जातात.

Ganga Aarti Nashik Location

गंगा आरती नाशिक स्थान

रामकुंड, पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र ४२२००३

गंगा आरती हे दररोज संध्याकाळी रामकुंडावर अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिरासमोर होते.

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More: नाशिक चा “नवश्या गणपती” त्याचा पेशवेकालीन इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

FAQ : Ganga Aarti Nashik

What is Ganga Aarti Nashik?

Ganga Aarti in Nashik is a ritualistic prayer ceremony held on the banks of the Godavari River, where devotees gather to offer prayers and witness the beautiful spectacle of lamps and incense being offered to the river.

When does the Ganga Aarti take place in Nashik?

The Ganga Aarti in Nashik usually takes place in the evening, around sunset, when the atmosphere becomes serene and conducive to spiritual practices.

Where does the Ganga Aarti in Nashik occur?

The Ganga Aarti in Nashik predominantly occurs at the Ramkund Ghat, a sacred bathing ghat on the banks of the Godavari River, which holds immense significance in Hindu mythology and pilgrimage.

What is the significance of attending the Ganga Aarti in Nashik?

Attending the Ganga Aarti in Nashik is believed to cleanse one’s sins and purify the soul. It is also considered an act of devotion and reverence towards the river, which is revered as a goddess in Hinduism.

Is the Ganga Aarti in Nashik open to everyone?

Yes, the Ganga Aarti in Nashik is open to all, irrespective of caste, creed, or nationality. Devotees and tourists alike are welcome to participate and experience the spiritual ambiance of the ceremony.

How long does the Ganga Aarti in Nashik last?

The duration of the Ganga Aarti in Nashik varies but typically lasts for about 30 to 45 minutes, depending on the day and the flow of devotees.

Are there any specific rituals involved in the Ganga Aarti in Nashik?

Yes, the Ganga Aarti involves various rituals such as chanting of hymns, waving of incense sticks, circling of lamps (diyas) in a rhythmic manner, and offering of flowers to the river, all accompanied by devotional songs and prayers.

Can visitors participate in the Ganga Aarti ceremony in Nashik?

Yes, visitors are encouraged to participate in the Ganga Aarti ceremony in Nashik. They can join in the singing of hymns, observe the rituals, and even offer their own prayers and offerings if they wish to do so.

What should one wear to the Ganga Aarti in Nashik?

There is no strict dress code for attending the Ganga Aarti in Nashik, but it is advisable to dress modestly and comfortably, keeping in mind the religious nature of the event.

Leave a Comment