कधी होणार नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गा चे काम पूर्ण?


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Pune Semi High Speed Railway: कधी होणार नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे चे काम पूर्ण? नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने २०२४ ते २०२५ च्या जमाखर्चा मधून २ हजार ४२५ कोटी रुपये इतकी, मान्यता दिली मागील २ वर्षापासून या प्रकल्पाचे काम दिम्या गतीने चालू होते. परंतु २ हजार ४२५ कोटीची मान्यता दिल्याने प्रकल्पाच्या कामास गती मिळण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

Nashik Pune Semi High Speed Railway Timeline

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे चे काम पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागेल?

बहु चर्चेत असलेल्या नाशिक पुणे या सेमी हायस्पीड प्रकल्पास रेल्वे मंत्रालया कडून मान्यता नसल्या कारणाने, इतके दिवस हा प्रकल्प व त्याचे भूसंपादन रेंगाळलेले होते. तर आता जमाखर्चा मधून या प्रकल्पाला निधी दिल्याने, या प्रकल्पाचे रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला दिसून येत आहे.

नाशिक पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाचे उभारणीसाठी राज्य सरकारने महारेल कार्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली असून, व या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येक २०% इतका निधी देणार. असून, उर्वरित निधी महारेल कार्पोरेशन या कंपनीकडून कर्ज स्वरूपात उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी कमीत कमी रेल्वे मार्ग उभारणीसाठी तब्बल ५ वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे. महारेल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने नाशिक, नगर तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करून जमीन धारकांना त्यांच्या जमिनीची योग्य रक्कम दिली आहे.

Nashik Pune Semi High Speed Railway

मात्र मधल्या काही काळात या रेल्वे प्रकल्पाच्या मार्ग व त्याचे भूसंपादन याला रेल्वे मंत्र्यांनी मान्यता नसल्याची बाब समोर आली होती. तेव्हापासून या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी निधी मिळत नसल्यास कारणाने, हा प्रकल्प रखडला होता. माननीय अजित पवार या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी आग्रही आहे व आजित पवार यांनी काही महिन्यापूर्वी या प्रकल्पातील काम मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली होती. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या कामाला हिरवा कंदील दिला नंतर २४२४ कोटीची मंजुरी दिली.

What benefits will cities along the Pune Nashik Railway route get?

नाशिक- पुणे रेल्वे मार्गातील शहरांना काय फायदा होणार?

अलिकडच्या वर्षांत पुणे आणि नाशिक शहरांची आर्थिक वाढ झपाट्याने झाली आहे, आणि या वाढीबरोबरच पुणे-नाशिक मार्गाने होणाऱ्या लोकांच्या आणि मालाच्या वाहतुकीतही मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक हे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात, जिथे सामाजिक-आर्थिक विकासाचा वेग अतिशय वेगवान आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील या महत्त्वाच्या शहरांचा थेट संबंध नाही. नवीन प्रस्तावामुळे केवळ जास्त गाड्यांची संख्या येण्याची शक्यता नाही. तर त्याच वेळी सेमी हायस्पीड प्रवासामुळे या मार्गावर जास्त प्रवासी आकर्षित होतील. हे पट्ट्यावरील औद्योगिक कॉरिडॉरसाठी उत्प्रेरक म्हणून देखील कार्य करेल, त्यामुळे या प्रदेशाला अधिक महसूल मिळेल.

Nashik Pune Semi High Speed Railway Route Map

नाशिक पुणे रेल्वे मार्ग नकाशा

Nashik Pune Semi High Speed Railway

अशाच नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गोष्टी, पर्यटने आणि ताज्या घडामोडी मिळविण्यासाठी माझं नाशिक या वेब पेज ला फॉलो करा किंवा व्हाट्सऍप ग्रुप ला जॉईन व्हा!

Read More:

नाशिक जिल्ह्यात तब्बल ४०,००० हून अधिक कुणबी नोंदी सापडल्या

ई लर्निंग एम पी ए नाशिक बद्दल सविस्तर माहिती

Leave a Comment